
करमाड : माझी मुलगी सोनलच्या आठवणीत मी जीवन संपवत आहे कोणाला दोषी धरू नये, असा मजकूर चिठ्ठीत लिहून करमाड येथील एका शिक्षकाने विहिरीत ऊडी घेत जीवन संपविले. ही घटना मंगळवार (ता.२०) सकाळी आठच्या सुमारास घडली. सुनील मिट्टू तारो (वय ४७) असे शिक्षकाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, सुनील तारो हे करमाड येथील न्यू हायस्कूलमध्ये शिक्षक होते.