Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर
Free Distribution : खासदार बजरंग सोनवणेंच्या पुढाकाराने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी १८ जुलैपासून मोफत कृत्रिम अवयव आणि सहायक उपकरणे वितरण शिबिर आयोजित केले जात आहे.
बीड : दिव्यांगांना केवळ सहानुभूतीच नाही तर आत्मनिर्भरतेसाठी भक्कम साथ मिळाली पाहिजे या हेतूने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देणारी मोफत कृत्रिम अवयव व सहायक उपकरणे वाटप योजना हाती घेतल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली.