आडूळ - आडुळ खुर्द ते आडूळ तांडा मार्गे खडकी तांडा या रस्त्याच्या प्रधानमंञी ग्राम सडक योजने अंतर्गत सुरु असलेले काम अंतीम टप्यात असतांना येथील अतिक्रमणधारकांना पोलीस प्रशासनासह प्रधानमंञी ग्राम सडक योजनेच्या अधिकारयांनी अतिक्रमण काढण्याबाबत वारंवार सुचना देवुन ही अतिक्रमण काढीत नसल्याने अर्धवट केलेले रस्त्याचे डांबरीकरणाचे काम गेल्या दिड दोन महिन्यांपासुन रखडले होते.
यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या येथील नागरीकांना मोठा ञास सहन करावा लागत होता. याबाबत येथील नागरीकांनी अतिक्रण धारकांनावर कडक कारवाई करुन सदरिल रखडलेले काम त्वरीत सुरु करावे अशी मागणी संबधित विभागाकडे वारंवार करुन ही हे काम "जैसे थे" स्थितीत होते.
याविषयी दैनिक सकाळ मध्ये ता. ११ रोजी 'स्त्याच्या कामाला अतिक्रमणधारकांची आडकाठी.. आडूळ तांडा डांबरीकरणाचे काम रखडले, कारवाईची करण्याची नागरिकांची मागणी". या मंथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित होताच ४८ तासांच्या आत म्हणजेच गुरुवारी (ता. १३) रोजी सकाळी प्रधानमंञी ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार व पाचोड पोलिस ठाण्याचे आडुळ बिट जमादार अफसर बागवान यांनी फौजफाट्यासह आडुळ तांडा व खडकी तांडा येथील अतिक्रमण दोन जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. अतिक्रमण काढल्यामुळे रस्त्याचे रखडलेले काम तर पुन्हा सुरु झालेच शिवाय रस्ता रुंद झाल्याने अगोदर एक वाहन चालने आवघड असलेल्या ठिकाणी दोन वाहने व्यवस्थित चालणार आहे.
अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तात पथक दाखल होताच काही अतिक्रमण धारकांनी आपापले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती तर काहींच्या अतिक्रमणावर जेसीबी चालवुन जमीनदोस्त करण्यात आले.
हे अतिक्रमण काढण्याचे काम दोन दिवस चालणार असुन त्यानंतर आडुळ खुर्द येथील ही अतिक्रण जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती येथे उपस्थित अधिकारयांनी दिली. तर सकाळ मध्ये बातमी प्रसिध्द होताच रखळले काम पुन्हा सुरु झाल्याने व अतिक्रण जमिनदोस्त केल्याने दोन्ही तांड्यासह आडुळ खुर्द व बुद्रुक येथील नागरीकांनी सकाळचे धन्यवाद मानले आहे.
सकाळ ने आमची व्यथा ऐकुन आमची अडचण लक्षात घेत ज्या अतिक्रणधारकांमुळे हे काम बंद पडले होते त्याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केल्याने आज हे रखडलेले काम पुन्हा सुरु करण्यात आले. धन्यवाद सकाळ माध्यम समुह
- आजीम शेख, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.