Parbhani Accident News
Parbhani Accident Newsesakal

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या गौरवचा दुर्दैवी मृत्यू, सुटीसाठी आला होता घरी

गौरव हा पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तो सुटी असल्याने गावी आला होता.
Published on

पूर्णा (जि.परभणी) : झिरा फाट्याहुन पूर्णेकडे जाणाऱ्या कार व समोरुन येणारी दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. त्यानंतर दुचाकीवरील तरुण धावत्या ट्रॅक्टरच्या ऊसाच्या ट्राॅलीखाली गेल्याने जागीच ठार झाला आहे. या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सदरील घटना एरंडेश्वर शिवारातील कला केंद्राजवळ सोमवारी (ता.२७ ) रात्री आठ वाजता घडली आहे. जखमींवर परभणी (Parbhani Accident) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गौरव राजू रामपूरकर (वय २२, रा.एरंडेश्वर, ता.पूर्णा ) असे त्या मृत तरुणांचे नाव आहे. सदरील तरुण पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण (Engineering) घेत होता. तो सुटी असल्याने गावी आला होता. गौरव हा मित्र राम बाबाराव काळे (वय २३), गजानन रंगनाथ शिंदे (वय २२) यांच्या सोबत एरंडेश्वर येथून झिरोफाट्याकडे (Pune) दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या चारचाकी कार व दुचाकीची जोरात धडक झाली.

Parbhani Accident News
Hailstorm In Marathwada | औरंगाबाद, जालना, हिंगोली जिल्ह्यात गारपीट

त्याचवेळी रस्त्याच्या बाजुने उसाने भरलेले हे ट्रॅक्टर जात होते . गौरव रामपूरकर हा त्या ट्रॅक्टराच्या खाली फेकल्या गेल्याने त्यास गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू पावला. त्याच्यासोबत असलेले राम काळे, गजानन शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या आवाजाने परिसरातील वाहन चालक, शेतकरी यांनी तातडीने तिघांनाही परभणी येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले दरम्यान डॉक्टरांनी गौरव यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, नितीन वडकर, विष्णु भिसे, किशोर कवठेकर, कलीम सय्यद आदींनी घटनास्थळी जाऊन वाहने ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करुन दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com