Engineer Rescued : इराणमध्ये अडकलेला अभियंता सुखरूप मायदेशी; व्यवसाय मार्गदर्शनार्थ गेले असता बेपत्ता
Iran Rescue : व्यवसाय मार्गदर्शनासाठी इराणमध्ये गेलेला वसमतचा अभियंता योगेश पांचाळ दोन महिन्यांपासून बेपत्ता होता. भारतीय दूतावासाच्या मदतीने त्याची इराणमधून सुटका झाली आणि बुधवारी मुंबईत परत येताच कुटुंबीयांचा आनंद गगनात गेला.
वसमत : व्यवसाय मार्गदर्शन घेण्यासाठी इराणमध्ये गेलेला येथील अभियंता योगेश पांचाळ हा दोन महिन्यांपासून बेपत्ता होता. भारतीय दूतावासाच्या मदतीने त्याची इराणमधून सुटका झाली. बुधवारी (ता. पाच) पहाटे तो मुंबईला येताच कुटुंबीयांना हायसे वाटले.