

Hingoli News
esakal
देवगावफाटा: उन्हाळ्यात बाजारात आंबा, केळी, पपई, खरबूज, टरबूज आदी फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांकडून कच्ची फळे लवकर पिकवण्यासाठी ‘इथिलीन रॅपनर’सारख्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे फळे दिसायला आकर्षक वाटत असली तरी त्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. याकडे अन्न औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.