परदेशात ‘एमबीबीएस’ करण्याकडे कल वाढत आहे. लातूरमधील विद्यार्थी रशिया, किर्गिझस्तान या दोन देशांत सर्वाधिक प्रमाणात जातात. त्यानंतर चीनमध्ये जातात.
लातूर : भारतातील खासगी वैद्यकीय शिक्षण (Medical Education) संस्थांमधील वाढलेले शुल्क, स्पर्धा, लोकसंख्येच्या तुलनेत कमी जागा अशा कारणांमुळे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्यातही देशभरातून सर्वाधिक विद्यार्थी सध्या रशिया आणि किर्गिस्तानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण (MBBS Education) घेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.