esakal | हिरोईन या शब्दाचा अर्थ डॅशिंग आणि कर्तबगार होतो बबनराव लोणीकर यांची सारवासारव 
sakal

बोलून बातमी शोधा

हिरोईन या शब्दाचा अर्थ डॅशिंग आणि कर्तबगार होतो बबनराव लोणीकर यांची सारवासारव 

विरोधकांनी माझ्या वक्तव्याचं भांडवल न करता गुगल वर जाऊन हिरोईन या शब्दाचा अर्थ तपासावा. असं सांगत बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाना गुगलच्या सर्च इंजिन वर जाऊन हिरोईन या शब्दाचा अर्थ काढणारे व्हिडीओ देखील पाठवले आहे. 

हिरोईन या शब्दाचा अर्थ डॅशिंग आणि कर्तबगार होतो बबनराव लोणीकर यांची सारवासारव 

sakal_logo
By
महेश गायकवाड

जालना : परतूर तालुक्‍यातील वीज उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात आक्षेपार्ह वक्तव्य चांगलेच व्हायरल झाल्यानंतर माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्हीडीओ संदेश तयार करुन सारवासारव केली आहे. माझ्या वाक्‍याचं भांडवल करू नका, हिरोईन या शब्दाचा अर्थ डॅशिंग आणि कर्तबगार महिला असा होतो. असे म्हणत रविवारी (ता.2) सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

परतूर येथील कार्यक्रमाची ऑडीओ क्‍लिप व्हायरल झाल्यानंतर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या वक्तव्यांच स्पष्टीकरण दिले असून मी वाईट अर्थाने तहसीलदारांना हिरोईन म्हणालो नसून हिरोईन या शब्दाचा अर्थ डॅशिंग आणि कर्तबगार महिला असा होतो.

संबंधित बातमी : आपल्या तहसीलदार मॅडम हिराॅईनसारख्याच दिसतात - बबनराव लोणीकरांचे आक्षेपार्ह...

तहसीलदार या डॅशिंग महिला अधिकारी असून त्यांना मी वाईट हेतूनं हिरोईन म्हणालो नाही. विरोधकांनी माझ्या वक्तव्याचं भांडवल न करता गुगल वर जाऊन हिरोईन या शब्दाचा अर्थ तपासावा. असं सांगत बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाना गुगलच्या सर्च इंजिन वर जाऊन हिरोईन या शब्दाचा अर्थ काढणारे व्हिडीओ देखील पाठवले आहे. 
 

loading image
go to top