12th Exam : प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी छापली उत्तरे, बोर्डाचा सावळा गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

12th Students exam

12th Exam : प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी छापली उत्तरे, बोर्डाचा सावळा गोंधळ

परंडा - मुलांच्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या बारावीच्या आज झालेल्या इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत चुका झाल्याची चर्चा इंग्रजी विषयाचा शिक्षकांमध्ये पेपर संपल्यानंतर सुरु झाली आहे.

या परिक्षेत प्रश्न क्रमांक A3, A4, आणि A5 या क्रंमाकांचे प्रश्न न विचारता थेट उत्तरेच देण्याचे काम इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत झालेले आहे. प्रश्न कमांक तीनमध्ये. A3 वA 5 या क्रमाकांचे प्रश्न न विचारता परिक्षकाला ज्या सुचना नमुना उत्तरपत्रिकेत दिलेल्या असतात.

त्या सुचना कृतिपत्रिकेत दिल्या आहेत. तर A4 चा प्रश्न अलंकार ओळखा आणि दिलेली ओळ लेखन नियमानुसार लिहा असा न विचारता थेट उत्तर कृतिपत्रिकेत दिलेले आहे. महाराष्ट्र शासनाने यावर्षी बारावीची परिक्षा कडक घेण्याबाबत भुमिका घेतली आहे.

त्या अनुशंगाने अनेक जिल्ह्यात पर्यवेक्षकांची अदला बदली केली आहे. परिक्षेचे सोंग सजून आले असले तरी प्रश्न पत्रिकेतील सावळ्या गोधळामुळे शिक्षण विभागाची गुणवत्ता चव्हाट्यावर आली आहे.

वर्षभर आहोरात्र अभ्यास करून बारावीची परिक्षा लांखो विद्यार्थी देतात. मात्र याचे गाभीर्य शिक्षण विभागाला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला असून मुलांना या प्रश्नाचे गुण मिळणार का? असा प्रश्न या चुकामुळे निर्माण झाला आहे.