परभणीत खळबळ : एसडीएमच्या गाडीवर रेती माफियांचा हल्ला; पोलिस हल्लेखोरांच्या मागावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनपेठ पोलिस

परभणीत खळबळ : एसडीएमच्या गाडीवर रेती माफियांचा हल्ला; पोलिस हल्लेखोरांच्या मागावर

सोनपेठ ( जिल्हा परभणी ) : सोनपेठ तालुक्यात (Sonpeth police) वाढत्या रेती चोरीच्या विरुद्ध उपविभागीय अधिकारी (sdm pathri) पाथरी यांनी कारवाई करण्यासाठी मोहीम राबवल्यामुळे रेती माफियांनी त्यांच्या गाडीवरच दगडफेक करुन हल्ला केल्याची घटना आज घडली. Excitement in Parbhani: Sand mafia attack on SDM's vehicle; Police on the trail of the attackers

तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरीच्या पात्रातून अवैध रेती उपसा जोरात चालू असून चोरलेली रेती परजिल्ह्यात पळवली जात आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्यावरून पाथरी येथील उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी अवैध रेती माफियांविरुद्ध एक मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र मंगळवारी ( ता. ११ ) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी निकाळजे हे आपल्या वाहनातून नरवाडी परिसरातून जात असतांना अचानक त्यांच्या गाडीवर अज्ञात रेती माफियांनी हल्ला केला. त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात येऊन त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. यामध्ये उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व त्यांचे चालक एकनाथ गायकवाड मात्र बालंबाल बचावले.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असून पोलिस त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दिवस रात्र बंदोबस्तात आहेत. सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विजय कोळी हे बंदोबस्त गस्तीवर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

रेती माफियांनी याआधी देखील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करून जखमी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तालुक्यातील लासीना, कान्हेगाव, खडका, मोहळा तसेच इतर ठिकाणाहून अवैध रेती उपसा केला जातो तसेच तालुक्या शेजारी असणाऱ्या पाथरी तालुक्यातील मुद्गल, मानवत तालुक्यातील वांगी या ठिकाणाहून देखील रेती उपसा हा रात्रंदिवस चालू असून त्याची संपुर्ण अवजड वाहतूक ही सोनपेठ तालुक्यातून सर्रास केली जाते. या अवैध व अवजड रेती वाहतुकीमुळे तालुक्यातील मुख्य रस्ते खराब झाले असून या रेती व्यवसायातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडवला जातो. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हे रेती माफिया अवैध रेती उपसा करत असून अधिकाऱ्यांच्या गाड्यावर हल्ले करणे तसेच पकडलेली वाहने पळवून नेण्याचे प्रकार देखील अनेकदा घडलेले आहेत.

उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी संबंधित प्रकार घडल्यानंतर सोनपेठ पोलिस ठाण्यात येऊन अज्ञात रेती माफियांच्या विरुद्ध तक्रार दिली असून सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता सोनपेठ पोलिसांनी रेती माफियांच्या विरुद्ध कडक मोहीम राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीपान शेळके करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Web Title: Excitement In Parbhani Sand Mafia Attack On Sdms Vehicle Police On The Trail Of The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top