Vashi Crime : फेसबुक लाईव्ह करण्याच्या कारणावरुन नगरसेवकंमध्ये मारहाण; उपनगराध्यक्ष, चार नगरसेवक व अन्य दोघावर गुन्हा दाखल

नगर पंचायतच्या विशेष सभेत भाजपाच्या नगरसेवकात झाली मारामारी.
Beating
Beatingsakal
Updated on

वाशी - नगर पंचायतीच्या विशेष सभेचे फेसबुक लाईव्ह करण्याच्या कारणावरुन भाजपाच्या नगरसेवकंमध्ये मारहाण होऊन बळवंतराव कवडे व श्रीकृष्ण कवडे यांनी एकमेकांविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन उपनगराध्यक्ष, चार नगरसेवक व अन्य दोघावर वाशी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बळवंतराव कवडे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे,सोमवार (ता. १०) रोजी नगर पंचायत कार्यालयात नगराध्यक्ष विजयाबाई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्याधिकारी यांना मी सांगीतले मा.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आपण सदर बैठक व्हीडीओग्राफीव्दारे घ्यावी.तसेच मागील बैठकीत मांडलेल्या ठरावातील मजकुर तुम्ही सोईप्रमाणे का बदलला असे विचारत सदर बैठकीचे फेसबुक लाईव्हं करत असताना नगरसेवक श्रीकृष्णं उर्फ राजु कवडे, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे व त्यांनी बोलावुण घेतलेले सुहास कवडे यांनी मला शिविगाळ करत लाथा बुक्यानी व प्लाष्टिकच्या खुर्चीने मारहाण केली. सदरच्या तक्रारीवरुन वरिल तिघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर श्रीकृष्ण उर्फ राजु कवडे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. नगर पंचायतीच्या हाँलमध्ये विशेष सभा सुरु असताना सभेचे मोबाईलमध्ये शुटींग काढण्याच्या कारणावरुन नगरसेवक बळवंत कवडे, विकास पवार, भागवत कवडे यांनी मला शिविगाळ करत हॉलमधील प्लॅस्टीकच्या खुर्चीने व लाथा बुक्यानी मारहाण केली.

तसेच यावेळी जुबेर अहेमद दाऊद काझी याने वरील तिघाची बाजु घेऊन 'तु गोरक्षकच्या मुलांना मदत करतो' असे म्हणत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सदरच्या तक्रारीवरुन वरिल चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, अधिक तपास पोलीस हे. काँ. शंकर लोंढे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com