

लातूर : लातूर जिल्ह्याचा सर्व क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात विकास व विस्तार होत आहे. त्यामुळे लातूर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे विमानतळाचा तातडीने विकास करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. २५) दिले. या विमानतळाचा लातूरसह बीड, धाराशिव या जिल्ह्यांतील नागरिकांना लाभ होईल, असेही ते म्हणाले.