Latur News : लातूरमध्ये नऊ जणांवर गुन्हा; आधार कार्ड बोगस, पुरावेही खोटे; बांगलादेशींची घुसखोरी!
Fake Aadhaar : लातूरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर : बनावट कागदपत्रांद्वारे बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी लातूरमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.