Farmer Fraud: शेतकरी, शासनाची फसवणूक; तीन सेतू केंद्र चालकांवर गुन्हा

Solar Pump Scheme Fraud : परभणी जिल्ह्यातील सेलू येथे सौर कृषिपंप योजनेच्या अर्जांसाठी बनावट जात प्रमाणपत्रे सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तपासात २४ अर्जांपैकी ११ अर्ज रद्द करण्यात आले असून, तीन ऑनलाइन सुविधा केंद्र चालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Police have registered a fraud case against three online service centre operators in Selu over alleged fake caste certificates.

Police have registered a fraud case against three online service centre operators in Selu over alleged fake caste certificates.

esakal

Updated on: 

सेलू, : सौर कृषिपंप योजनेसाठी अर्ज भरताना ऑनलाइन सुविधा केंद्र चालकाने खोटे, बनावट जात प्रमाणपत्र तयार करून प्रस्ताव दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तपासादरम्यान शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे आढळल्याने तीन सुविधा केंद्र चालकांवर रविवारी (ता. एक) सेलू पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...