
ताडकळस (ता. पूर्णा) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रसूतीसाठी रेफर केलेल्या महिलेची खासगी रुग्णालयात प्रसूती झाली. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याने याच केंद्रात प्रसूती झाल्याची नोंद घेतल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.