
पाचोड : १०:२६:२६ या खताला पोषक पर्याय असल्याचे सांगून गावोगावी बनावट रासायनिक खताची विक्री करणाऱ्या दोन जणांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची व कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रक पथकाच्या तक्रारीवरून शेतकऱ्याची फसवणूक व बनावट खताचे उत्पादन केल्याबद्दल संबंधीत उत्पादीत कंपनीसह पाच जणांविरुद्ध शनिवारी (ता.१७) रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधीताक डून रासायनिक खताच्या वीस बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत.