सगरोळी परिसरातील ते भामटे मोकाटच

images (5).jpg
images (5).jpg
Updated on


सगरोळी, (ता.बिलोली, जि. नांदेड) ः दहा दिवसांपूर्वी आदमपूर (ता. बिलोली) परिसरात लॉकडाउन काळात पोलिस असल्याचे सांगून बाहेर फिरणारे नागरिक, किराणा दुकानदार, औषधी दुकानदार, व्यापारी, शेतकरी यांना धमकाऊन जबरीने पैसे घेतलेल्या व मारहाण करणाऱ्या त्या भामट्यांवर अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने हे भामटे मोकाटच सुटल्याचे दिसत आहे.


आठ दिवसांपूर्वी चार भामटे चार चाकी वाहनातून सतत चार दिवस फिरत आम्ही पोलिस असल्याचे सांगून परिसरातील आदमपूर, मुतन्याळ, खतगाव, केसराळी, हिप्परगा, येथील दुकानदार व शेतकऱ्यांना लॉकडाउन काळात बाहेर का फिरत आहात म्हणून मारहाण केली. यादरम्यान अनेक दुकानदारांकडून पैसेही वसूल केले. अक्षरशः या भामट्यांनी परिसरात धुमाकूळ घातला होता. मंगळवारी (ता.सात) आदमपूर येथे सायंकाळी धमकाऊन पैसे काढताना व मारहाण करतांना काही नागरिकांना संशय आला, त्यांनी ओळख पत्राची मागणी केली असता, बिंग फुटल्याचे लक्षात येताच आपल्या चार चाकी वाहनातून खातगाव मार्गे पळ काढला.


अज्ञात भामट्यांविरुद्ध लेखी तक्रार
गावातील तरुणांनी त्यांचा पाठलाग केला असता, वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न व वाहनाचा अतिवेग असल्याने तरुणांच्या हाती हे भामटे सापडले नाहीत. आदमपूर येथील नागरिकांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी (ता. आठ) रामतीर्थ पोलिस स्टेशनमध्ये चारचाकी वाहनाच्या क्रमांकासह अज्ञात भामट्यांविरुद्ध लेखी तक्रार केली. दुसऱ्याच दिवशी वाहनासह या भामट्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.


गुन्ह्यातील वाहनासह भामटेही मोकाटच
(एमएच ०३ - सीबी ०००२) मुंबई पासिंग या क्रमांकाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन या भामट्यांनी वापरली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर हे वाहन क्रमांक टाकले असता या वाहनाचा मालक नितीन डी. काळे असल्याचे दिसते. या बाबत रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता या सर्वांवर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या न्यायालयाचे कामकाज बंद असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजार करता येत नसल्याने आरोपींना ताब्यात घेतले नसल्याचे सांगितले.

या गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन आरोपींनी गायब केले असल्याचे ते म्हणाले. लॉकडाउनमुळे सर्वत्र नाकाबंदी असतांना वाहन गायब कसे होऊ शकते? आरोपी, वाहन व वाहन मालकावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याने कुठेतरी पाणी मुरत असल्याचे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे. तर या भामट्यांना काही राजकीय पुढाऱ्यांकडूनही आश्रय मिळाल्याचे बोलले जात असून लॉकडाउन काळात सर्वसामान्यांना मारहाण करून लुटणाऱ्या या गुंडांना प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पाठीशी न घालता कठोर शिक्षा करावी या अपेक्षेने परिसरातील नागरिक या प्रकरणाकडे लक्ष लावून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com