

बीड : नगर पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वरदहस्ताने शहरातील पालिकेच्या मालकीच्या भुखंडाचे बनावट पीटीआर करुन या जागा भूमाफियांकडून लाटल्या जात आहेत. आता या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.