या प्रकरणातील आरोपी साधारण एक अकाउंट किट एक ते दोन लाख रुपयांपर्यंत विकत असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
भोकरदन (जालना) : बनावट ट्रेडिंग प्रकरणांमध्ये (Fake Trading Case) अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल सोनवणे (Vishal Sonawane) हा अद्यापही फरार असून सायबर पोलिसांनी बारामतीतून शुभम सोरटे या युवकाला या प्रकरणी अटक केलीये. तो आदित्य इंगळे याचा मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे.