
गेवराई : तालुक्यात विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली असून, तिला मारहाण करून विहिरीत फेकल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाइकांनी केला आहे. सर्वांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी करत मंगळवारी सकाळी एसपी कार्यालयात नातेवाइकांनी आक्रोश केल्यानंतर सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.