Bhoom Crime : छेडछाडीच्या प्रकरणावरून कुटुंबावर हल्ला; दोनजण गंभीर जखमी

मुलीच्या छेडछाड प्रकरणी तालुक्यातील बावी येथे जाब विचारला असता मुलीच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला.
Bavi Village Close
Bavi Village Closesakal
Updated on

भूम - मुलीच्या छेडछाड प्रकरणी तालुक्यातील बावी येथे जाब विचारला असता मुलीच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ल्याची घटना ता. २३ रोजी दुपारी २. ३० च्या दरम्यान घडली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे बावी गावातील गावकऱ्यांनी दि. २५ रोजी गाव बंद ठेवले आहे. आरोपीना कठोर शिक्षा ची मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बावी येथील फिर्यादी भागवत राजेंद्र उभे हे बीवी येथे राहतात. त्यांच्या मुलीस आरोपी बाबा विजय काळे हा सातत्याने घरासमोर जाताना गाडीचा हॉर्न वाजवून मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करत होता.

यापूर्वी अनेकदा त्याने असेच छेडछाडीचे प्रकार केलेले असल्याने याबाबत गावाचे सरपंच यांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवले होते. तरीही आरोपी बाबा काळे हा घरासमोरून येता-जाता छेडछाड करत होता. याबाबत फिर्यादी भागवत राजेंद्र उभे यांनी आरोपीस याबाबत जाब विचारला व अनेकदा समज ही दिली. तरीही हे प्रकरण सरपंच यांनी मिटवले.

आरोपी घराकडे निघून गेले. त्यानंतर आपसात संगणमत करून मुख्य आरोपी बाबा विजय काळे, विजय राजाराम काळे, राजाराम काळे, आरती विजय काळे, मोनिका बाबा काळे, सर्व राहणार बावी यांनी उभे कुटुंब अंगणात बसलेले असताना हातात लोखंडी रॉडने येऊन येऊन आमच्या मुलाने हॉर्न वाजवल्याने तुम्हाला काय त्रास होतो. असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

बाबा काळे व विजय काळे यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत मोठा भाऊ अशोक यास त्यांच्याकडील लोखंडी रॉडने मारले. माझी आई इंदुबाई उभे व पत्नी चंदा उभे यांना विजय काळे व मोनिका बाबा काळे लाथा बुक्क्याने मारहाण केली.

तसेच माझा मुलगा यश भांडणे सोडवण्यासाठी गेला असता, आरोपींनी त्याला लाथा बुक्यानी मारहाण केली. शेजारील नागरिकांनी भांडणे सोडवल्यानंतर जखमी अशोक राजेंद्र उभे व त्यांची आई इंदुबाई उभे यांना प्रथमोपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी धाराशिव येथे पाठवले आहे.

भूम तालुक्यातील बावी येथे मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणावरून मुलीच्या कुटुंबांना मारहाण करण्यात आली. यामधील पाच आरोपीपैकी चार आरोपी पकडण्यात आले आहे. व एक आरोपी फरार आहे. पुढील तपास चालू आहे.

- वर्षा साबळे, पोलीस उपनिरीक्षक

आरोपी हत्यार सोबत घेऊन फिरत आहे. त्याच्यामुळे आम्हाला गावांमध्ये राहणे कठीण झाले आहे व आमच्या मुलांना धमकी देत आहे.

- चंदा उभे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com