Crime News : नवविवाहितेची आत्महत्या; वाळूजमहानगर परिसरातील घटना
वाळूजमहानगर - नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. बजाजनगर येथील आर एल १०६ कनकधारा सोसायटीमध्ये घडलेली ही घटना सोमवारी (ता.३०) दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
कनकधारा हाऊसिंग सोसायटी बजाजनगर येथील अंजली बिरेन्द्रसिंग गौतम वय २० मुळ रा. कानपूर हिचे सुमारे अडीच महिन्यापूर्वी लग्न झाले होते. पतीबरोबर तिचा वाद झाल्याने तिने सोमवारी गळफास घेतला. बराच वेळ दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकाऊन पाहिले असता अंजलीने गळफास घेतल्याचे दिसले.

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत मृतदेह घाटीत दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. अंजलीचे रोहित आव्हाड याच्यासोबत प्रेमसंबंध होते. सुमारे अडीच महिन्यापूर्वी अंजलीचा रोहित आव्हाड याच्यासोबत प्रेम विवाह झाला. परंतु दोघांमध्ये वाद झाल्याने अंजली आईकडेच राहत होती.