आष्टा कासार (ता. लोहारा) - येथील ब्रेनस्ट्रोक नंतर मृत्यू झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या स्तुत्य उपक्रमाने भारावून जात, बुधवारी (ता. पाच) अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह गावात आणण्यात आला असता, गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. आष्टा कासार येथे मृत्यूनंतर अवयवादानाचा हा या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना असून या ईश्वरी कार्यामुळे परिसरात कौतुक होत आहे.
आष्टा कासार (ता. लोहारा) येथील या अवयवदात्या युवकाचे नाव सचिन दयानंद मोरे (वय-३३) असे असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार व सहा वर्षाचे दोन मुले आहेत. त्यांच्या वडिलांचे मुळ गाव हे जळकोट (ता. लोहारा) असून लग्ना नंतर वडील दयानंद हे कुटुंबसह राहाण्यासाठी आष्टा कासार येथीच आले. परंतु दुर्दैवाने लग्नानंतर दोन वर्षांतच वडीलांचा मृत्यू झाला.
सचिन हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा. कुटुंबकर्त्याचा अकाली निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या नंतर पुढे मामाकडे राहात सचिन बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केला. सध्या उदरनिर्वासाठी ते रिक्षा चालवत होते. आर्थिक परिस्थिती हालगीच्या असताना दोन वर्षापासून त्यांना फीट येण्याचा त्रास होत होता.
चार दिवसात पूर्वी रविवारी (ता. ३०) अचलेरकडे जात असताना ब्रेनस्ट्रोक झाल्याने ते कोमात गेले, यानंतर त्यांना सोलापूर येथील सीएनएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी प्रयत्न करून सुद्धा त्याच्या शरीराची साथ मिळत नसल्याचे सांगत अवयव दान करावे, जेणे करून इतरांना जीवनदान मिळेल असा सल्ला दिला.
अशा वेळी घरच्यांचा निर्णय महत्वाचा होता. नातेवाईकांनी मनावर दगड ठेऊन अवयवादानाचा निर्णय घेतला. या नंतर बुधवारी (ता. २) सोलापूर येथील सीएनएस रुग्णालयात सचिन यांच्या शरीरातील हृदय, किडनी, फूफूस आदी अवयदानाची प्रक्रिया पार पडली.
हे अवयव त्वरित डी वाय पाटील रुग्णालय पुणे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मुंबई व अश्विनी रुग्णालयात सोलापूर येथील गरजू रुग्णांसाठी रवाना करण्यात आले आहे. या अव्ययदान प्रक्रियेसाठी गावातील संजय चुंगे, विशाल शितोळे, गोविंद वताडे, अमोल मदने रामलिंग सोमवंशी, राम बेळ्ळे आदिनी सहकार्य केले.
या स्तुत्य उपक्रमाने गावकरी भारावून गेले असून बुधवारी (ता. पाच) सायंकाळी साडेसात वाजता अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह गावात आणण्यात आला असता येथील आष्टा हायस्कूल, सहारा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांनी दुतर्फा साखळी करून पुष्पवृष्टी केली. यानंतर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
येथील ग्रामपंचायतसह विविध संस्थांनी अंत्यसंस्कारासाठी विशेष प्रयोजन केले होते. आष्टा कासार येथे दोन महिन्यापूर्वीच मृत्यूनंतर ३८ वर्षीय सुवर्णा युवराज सगर या महिलेने अवयवदान केले असून दोन महिन्यांतील अवयवदानाची ही दुसरी घटना असल्याने या ईश्वरी कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.