
चिकलठाणा : एका महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) दाखल करण्यात आले होते. येथे सिझेरियन करताना इजा झाल्याने महिलेची प्रकृती खालावली. यानंतर उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर सोमवारी (ता. नऊ) महिलेच्या मृतदेहासह नातेवाईक सामान्य रुग्णालयात आले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी मध्यस्थीने केल्याने मृतदेह ताब्यात घेऊन याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली.