माजलगावात शेतातील एक क्विंटल भेंडी मोफत घरपोच 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

सध्या कोरोनामुळे जीवनचक्र बदलले आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी गरजूंना शेतमाल मोफत वाटप करू लागले आहेत.

माजलगाव (जि.  बीड) - ग्रामीण भागात हातावर पोट असणाऱ्या शेतमजूर, गरीब लोकांना शेतातील एक क्विंटल भेंडी अॅड. अशोक डाके यांनी मोफत वाटप केली. लॉकडाऊनमुळे लोकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांनी शेतातील एक क्विंटल भेंडी मोफत घरपोच वाटप करून गरजूंना आधार दिला आहे. यावेळी दत्ता डाके, अशोक डाके, पांडुरंग उबाळे, सय्यद सलीम उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farm Goods Free Shipping at Majalgaon

Tags
टॉपिकस
Topic Tags: