Dharashiv News: सालगड्याच्या खूनप्रकरणी एकास अटक; धाराशिव येथील घटना
Crime News: उचल दिलेल्या रकमेवरून झालेल्या वादात धाराशिव जिल्ह्यातील सालगडीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. संशयित बापाला अटक करण्यात आली असून मुलगा अल्पवयीन आहे.
धाराशिव : घेतलेली उचल परत न दिल्याच्या कारणावरून बाप-लेकाने केलेल्या मारहाणीत शेतमजुराचा (सालगडी) मृत्यू झाल्याची घटना सांजा (ता. धाराशिव) येथे घडली. येथील आनंदनगर पोलिसांनी यातील मुख्य संशयिताला अटक केली आहे.