हिंगोली : भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कोणताही विषय नव्हता असा दावा पक्षाचे नेते व कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी हिंगोली येथे शनिवारी केला आहे. हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना ‘मोदी सरकारची यशस्वी ११ वर्षे’ या मुद्यावर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदी पदाधिकारी उपस्थिती होते