

Fatal Land Dispute: Violent Clash Over Farm Road Leaves One Dead in Gangapur
Sakal
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगावजवळील मंजरपूर शिवारात शुक्रवारी (ता.२२) शेतरस्त्याच्या जुन्या वादातून दोन चुलत भावांच्या गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.