Beed Crimesakal
मराठवाडा
Beed Crime: पैशांच्या वादातून भावंडांवर सहा जणांचा जीवघेणा हल्ला
Beed News: बीडमध्ये पैशांच्या वादातून सहा अनोळखी हल्लेखोरांनी शेतकरी विलास आणि त्याची बहीण भाग्यश्री यांच्यावर मध्यरात्री घरात घुसून झडप घेऊन हल्ला केला. दोघांना गंभीर जखमा झाल्या असून पोलिस तपास करत आहेत.
बीड : पैशांच्या वादातून सहा अनोळखी व्यक्तींनी शेतकरी विलास ऊर्फ गब्बर भारत मस्के (वय ३०) व त्याची बहीण भाग्यश्री अशोक सोजे (वय ३३) यांच्यावर मध्यरात्री घरात घुसून लोखंडी हत्यारांनी जीवघेणा हल्ला केला. ही घटना पालवण शिवारातील जटाळ वस्ती येथे २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास घडली.

