Farmer nagnath Shindesakal
मराठवाडा
Lohara News : पोलिस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला
दुभती गाय चोरीला जावून पाच महिने झाले, तरी शोध लागत नाही
लोहारा (जि. धाराशिव) - दुभती गाय चोरीला जावून पाच महिने झाले, तरी तीचा शोध लागत नसल्याने संतप्त पशुपालक शेतकऱ्यांने बुधवारी (ता. एक) लोहारा पोलिस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, पोलिसांनी १२६ कलमान्वये पशुपालक शेतकऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

