sanjay kohkade
sakal
पाचोड - खादगाव- खेर्डा रस्त्याच्या कामासाठी संबंधीत ठेकेदाराने खोदलेल्या दुतर्फा नालीद्वारे पावसाचे पाणी शेतात येऊन पिकाची नासाडी होत असल्याने, शेतात येणारे पाणी बंद करण्यासाठी शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीन्वये घटनास्थळ पाहणी व पंचनामा करण्यासाठी आलेल्या तलाठी व मंडळाधिकाऱ्याने प्रतिवादी शेतकऱ्याशी संगनमत करून उलट तक्रारदार शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने अपमानित झालेल्या संबंधित तक्रारदार शेतकऱ्याने पंचनामा सुरू असतांना अधिकारी - कर्मचारी व ग्रामस्थासमोरच विहारीत उडी घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना खादगाव (ता. पैठण) येथे मंगळवारी (ता. १६) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.