Video : वैतागलेल्या शेतकऱ्याने मकावर फिरविला रोटाव्हेटर

हबीब पठाण
रविवार, 29 सप्टेंबर 2019

पैठण तालूक्‍यात बहूतांशी ठिकाणी पाणीबाणी स्थिती 

औरंगाबाद : आधीच उशिराने पावसाचे आमगन, सध्या तर पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागते. त्यातच उशिराच्या पेरणीमुळे यंदा मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादूर्भाव झाल्याने पूर्ण पिक वाया गेले. त्यामुळे आता किमान रब्बी पिक लागवडीसाठी रान रिकामं करावे लागेल, रब्बी तरी चांगली येईल या आशेने पैठण तालूक्‍यातील थेरगावच्या शेख नजीर शेख अब्दूल यांनी पाच एकरावरील उभ्या मका पिकावर रोटाव्हेटर फिरविला.

पावसाळा सरत आला तरी थेरगाव, पाचोड (ता. पैठण) परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे, यंदा प्रथमच लष्करी अळीने थैमान घातल्याने मका आणि बाजरी पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. पिके वाचविण्यासाठीची ऊसनवारीने किटकनाशके खरेदी करुनही पिके हाती लागली नाहीत शेवटी ही धडपड थांबवत शेतकऱ्याने मकावर रोटाव्हेटर फिरवत रान रिकामे केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Destroyed Corn Crop By Rotavator Machine