ganesh lahamaghe
sakal
- अशोक चांगले
सुखापुरी - अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील दहिगाव खुर्द येथे मच्छीपालनासाठी तयार करण्यात आलेल्या शेततळ्यात मेलेले मासे काढण्यासाठी उतरलेल्या ३२ वर्षीय शेतकऱ्याचा पाण्यात तोल जाऊन बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश अंशीराम लहामघे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ७) सायंकाळी घडली.