शेतकऱ्यांनी भरले साडेचोवीस कोटींची विजबिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांनी भरले साडेचोवीस कोटींची विजबिले

शेतकऱ्यांनी भरले साडेचोवीस कोटींची विजबिले

जालना : जिल्ह्यातील ४१ हजार २३९ शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांनी आतापर्यंत २४ कोटी ५८ लाखाचे वीज बिल भरले आहे. दरम्यान कृषी पंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासह वीज बिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ता.३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कमही माफ करण्यात येत आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून राज्यात कृषिपंप वीजजोडणी धोरण राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषी पंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ८९० शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण ७७५ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे वीजबिलांपोटी १०१५ कोटी रुपयांची सुधारित थकबाकी आहे.

त्यापैकी ५० टक्के थकबाकी तसेच सर्व चालू वीजबिलांचा येत्या ता.३१ मार्चपर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे तब्बल ५०७ कोटी ५० लाख रुपयांची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४१ हजार २३९ शेतकऱ्यांनी २४ कोटी ५८ लाख रुपयांचे वीजबिल भरून योजनेत सहभाग घेतला आहे.

कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार कृषी वीजबिलांच्या चालू व थकीत बिलांच्या भरण्यामधील ६६ टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (३३ टक्के) आणि जिल्हास्तरावर (३३ टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात २५ कोटी २० लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. यामध्ये प्रत्येकी ८ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी हा ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे कृषी पंपांच्या नवीन वीज जोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे. सुधारित थकबाकीमध्ये ५० टक्के माफी ता. ३१ मार्चपर्यंत असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Farmer Filled Electricity Bill Agricultural Concession Benefits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top