Farmer Killed : गेवराईतील पाथर्डी–विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर सकाळी मुलीला भेटायला जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्याला भरधाव कारने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
गेवराई : मुलीला भेटण्यास जाण्यासाठी बसच्या प्रतिक्षेत बसलेल्या शेतक-यास भरधाव वेगातील कारने धडकल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी गेवराईतील पाथर्डी-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर घडली.