
देगलूर : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, खरीप व रब्बी गावातील पिक विमा त्वरित देण्यात यावा हाळी ते बेबंरा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी हाळी येथील शेतकरी शंकर पाटील जाधव यांनी स्वतःच्या शेतात ता.३० मार्चपासून आंदोलन सुरू केले होते. व ता. ३ एप्रिल पर्यंत शासनाने या मागण्या मान्य केल्या नाही तर स्वतःच्या शेतात जिवंत समाधी घेऊ असा इशारा त्यांनी प्रशासनाला देत शेतात खड्डाही खंडा होता.