गेवराई : वीज वाहिनीच्या तारेला स्पर्श (Electric Shock) करून गेवराईतील शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवलीये. दरम्यान, तारेला चिकटलेल्या वडिलांस काढताना मुलाचा देखील धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी घडली..अभिमान लक्ष्मण कबले (वय ४५) व ज्ञानेश्वर (माऊली) अभिमान कबले (वय २१) रा. मारफळा ता. गेवराई जि. बीड असे या दुर्घटनेत मृत झालेल्या बाप-लेकाचे नाव आहे. अभिमान कबले व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर हा एक एकर उसाला रासायनिक खत टाकताना शेतकरी (Farmer) अभिमान कबले यांनी शेतातील वीज वाहिनीच्या तारेला स्पर्श केला..Rain Incident : पावसामुळे घराची भिंत अंगावर कोसळून तीन वर्षांची चिमुरडी जागीच ठार; मोठी बहीण गंभीर जखमी.आपल्या वडिलांस करंट लागला असे निदर्शनास येताच मुलगा ज्ञानेश्वर हा वडिलांना बाजूला करत असतानाच त्याचा देखील यात मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व नातेवाइकांनी घटनास्थळावर धाव घेत या बाप-लेकास बीडच्या जिल्हा रुग्णालयात (Beed District Hospital) उपचारास दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले..Sujat Ambedkar : 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करण्याचे अधिकार जिल्हा कमिटीला'; सुजात आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका.दरम्यान, अभिमान कबले हे शेतकरी मागील दिवसांपासून कर्ज कसं फिटणार, मुलीच्या लग्नाचे काय होणार या विवंचनेत होते. यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती येथील सरपंच तथा नातेवाईक शरद कबले यांनी दिली. मात्र, मुलाने वडिलांस वाचवण्याचा प्रयत्न करताना त्याचा देखील धक्कादायक मृत्यू झाल्याने मारफळा गावात हळहळ व्यक्त होत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.