गेवराई - शेतातून घरी येत असताना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुरात वाहून गेल्याने बीडच्या गेवराईतील एका शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली असून, सदरील शेतक-याचा मृतदेह तब्बल पंधरा तासानंतर आढळून आला. ज्ञानेश्वर सखाराम पराडे (वय-३७) रा. टाकळगव्हाण, ता. गेवराई, जि. बीड असे मृत शेतक-याचे नाव आहे.