Crime News : शेतकऱ्याला चटके दिल्याच्या प्रकरणातील तीन संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अन्वा प्रकरणातील तीन आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
police custody
police custodySakal
Updated on

पारध - राज्यात खळबळ उडवून देणारी व माणुसकीला काळिमा फासणारी अन्वा (ता. भोकरदन) येथील शेतकऱ्यांला गरम लोखडी रॉडने चटके देऊन जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणात गेल्या दहा दिवसापासून पोलिस कोठडीत असलेल्या तीन संशयित आरोपीची पोलिस कोठडी मंगळवारी (ता. 11) संपल्याने न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

या प्रकरणाची माहिती अशी की, अन्वा (ता. भोकरदन) येथील शेतकरी कैलास गोविंदा बोराडे (वय-35) महाशिवरात्री निमित्त (ता. 26) फेब्रुवारीला वटेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले असता, जुन्या वादावरून जानेफळ गायकवाड (ता. भोकरदन) सोनू उर्फ भागवत सुदाम दौड, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा एका राजकीय पक्षांचा माजी तालुका प्रमुख नवनाथ सुदाम दौड या दोघां भावांनी लोखंडी रॉड चुलीत गरम करून कैलास बोराडे यांच्या संपूर्ण अंगाला, शौचालयाच्या जागी चटके देऊन गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणात पारध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता, तर भागवत सुदाम दौड, गंगाधर काळे, रामू काळे हे तीन संशयित आरोपी अटक करून पोलिस कोठडीत होते.मंगळवारी (ता. 11) त्यांची पोलिस कोठडी संपल्याने या तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून यातील संशयित आरोपी नवनाथ दौड मात्र अद्याप फरारीच आहे.

अन्वा प्रकरणातील तीन आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, या प्रकरणातील संशयित आरोपी नवनाथ सुदाम दौड याला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पारध पोलिस ठाण्याचे दोन पोलिस पथक स्थापन करण्यात आलेली असून ती त्याच्या मागावर आहेत. आणि पोलिस लवकरच त्याच्या मुसक्या आवळतील.

- संतोष माने, सहायक पोलिस निरीक्षक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com