A banana plantation being cleared with the help of a JCB machine due to a lack of water in Chikalthan
sakal
कन्नड - तालुक्यातील चिकलठाण येथील शेतकरी शेकनाथ रामराव चव्हाण यांनी पाण्याअभावी चिकलठाण शिवारातील गट क्रमांक ३९५ मधील दोन एकर क्षेत्रावरील केळीची बाग जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकली. मनरेगा योजनेअंतर्गत गेल्या वर्षी त्यांनी या फळबागेची लागवड केली होती. यंदा बागेत खोडवा ठेवला होता. केळीची वाढही चांगली झाली होती. मात्र, पाण्याची उपलब्धता नसल्याने भविष्यात बाग जगवणे शक्य होणार नसल्याने त्यांनी बाग काढण्याचा निर्णय घेतला.