बीड : नापिकी, कर्ज त्यातून आत्महत्या अशा दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी मांडण्यासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शेतकरी सहदेव होनाळे खांद्यावर नांगर घेऊन पायी विधान भवनाकडे निघाले आहेत. .सोमवारी (ता. सात) त्यांची पायी दिंडी तालुक्यातील लिंबागणेशला पोचल्यानंतर येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या दिंडीत सहभाग घेत या मागण्यांना समर्थन दिले. हडोळती येथील ७५ वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांनी खांद्यावर जोखड घेऊन शेती करतानाचा व्हिडिओ व फोटो प्रसिद्ध झाले. .त्यानंतर सरकारने या शेतकऱ्याला मदत केली. सरकार खांद्यावर जोखड घेतल्याशिवाय शेतकऱ्यांची दखल घेत नसेल, तर आता प्रत्येक शेतकऱ्याला नांगर घेऊनच रस्त्यावर उतरावे लागेल, असे होनाळे म्हणाले. चार जुलैपासून पायी निघालेले सहदेव होनाळे रविवारी (ता. पाच) लिंबागणेशला मुक्कामी पोचले..ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, सोमवारी त्यांच्या दिंडीत पायी चालत त्यांना समर्थन दिले. डॉ. गणेश ढवळे, राम फाळके, हरिओम क्षीरसागर, सुनील ढवळे, समीर शेख, लहु घोलप, चेतन कानिटकर, नवनाथ बोराडे, अर्जुन घोलप, खंडू वाणी आदी सहभागी झाले..Beed Trader Death Case : व्यापारी मृत्यू प्रकरणी दोघांना गुरुवारपर्यंत कोठडी.मी पदवीधर असून माझ्याकडे साडेनऊ एकर शेती आहे. कुटुंबात एकूण १३ जण असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. पण, शेतीमालाला बाजारभाव नाही, शासनाच्या आधारभूत किंमत योजनेत माल खरेदी होत नाही. मनरेगाच्या मजुरीचे पैसे प्रलंबित. एक रुपयात विमा योजना गुंडाळण्यात आली, मागील तीन वर्षांचा पीकविमाही मिळालेला नाही. शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत, संकटात, मृत्यूच्या उंबरठ्यावर पोचले आहेत.- सहदेव होनाळे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.