Farming Advice : मराठवाड्यात प्री-मॉन्सून पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पेरणीस अजून वेळ आहे, असा इशारा कृषी विद्यापीठाने दिला आहे. मराठवाड्यात प्री-मॉन्सून पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पेरणीस अजून वेळ आहे, असा इशारा कृषी विद्यापीठाने दिला आहे.
परभणी : मराठवाड्यातील अनेक भागांत सध्या मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून जमिनीत आर्द्रतेचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अजून मॉन्सूनचे आगमन झालेले नाही.