esakal | बीड जिल्ह्यात पिकविम्यासाठी शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Bombabomb Andolan

परतीच्या पावसाने खरीप पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. कापूस, बाजरी, सोयाबीन, ऊस आदी पिके हातची गेली आहेत.

बीड जिल्ह्यात पिकविम्यासाठी शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : परतीच्या पावसाने खरीप पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. कापूस, बाजरी, सोयाबीन, ऊस आदी पिके हातची गेली आहेत. विमा कंपनीने नुकसानग्रस्त पिकांचे स्थळ पंचनामे करावेत जेणेकरून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार आहे. या मागणीसाठी तालुक्यातील विविध ग्रापंचायतीसमोर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन रविवारी (ता.एक) करण्यात आले.

कांद्याच्या रोपांना रोगांची लागण; बियाणांचा दर वाढतोय, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला होता. वेचणीस आलेला कापुस, काढणीस आलेली सोयाबीन परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले हिरावुन घेतले. शासनाने या पिकांचे पंचनामे करून मदतीची घोषणा देखील केली. आता विमा कंपनीने घटनास्थळी जाऊन स्थळ पंचमाने करावेत व तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा करावेत. या मागणीसाठी तालुक्यातील आनंदगाव, टाकळी, शिंपेटाकळी, भाटवडगाव या ग्रामपंचायतीसमोर बोंबाबोंब आंदोलन करत ग्रामपंचायतीकडे मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर