कळमनुरीत घनकचरा प्रकल्पाला आग, अग्निशमन दलासह शेतकऱ्यांनी आणली आग आटोक्यात

file photo
file photo
Updated on

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला (डम्पिंग ग्राउंड) मंगळवार (ता. ३०) आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी हिंगोली व कळमनुरी पालिकेच्या अग्निशमन दलासह पाळोदी व परिसरातील  शेतकऱ्यांनी आणली आग आटोक्यात.

कळमनुरी पालिकेचा घनकचरा प्रकल्प पाळोदी परिसरात उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी शहरातील सर्व कचरा जमा करुन कचऱ्याची वर्गवारी केली जाते. दरम्यान मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या घन कचरा प्रकल्पात असलेल्या कचऱ्याच्या ढीगाला आग लागली. पाहता पाहता ही आग संपूर्ण प्रकल्पात असलेल्या कचऱ्याच्या ढीगापर्यंत पोहोचली. आग लागल्याचे वृत्त आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तातडीने पालिका प्रशासनाला कळविले.

त्यानंतर अभियंता नंदकुमार डाखोरे यांनी घटनेची माहिती घेऊन तातडीने कळमनुरी येथील त्र्यंबक जाधव यांना अग्निशमन दलाच्या वाहन घेऊन घटनास्थळी पाठवले घनकचरा प्रकल्पा मधील कचऱ्याचे सर्व ढीगाला आग लागल्याचे पाहून एका अग्निशमन दलाच्या वाहनाने आग आटोक्यात येणार नाहीत हे लक्षात घेऊन तातडीने हिंगोली पालीचे कडून अग्निशमन दलाचे वाहन मागवण्यात आले या दोन्ही अग्निशमन दलाच्या वाहनांकडून आज विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले.

त्यानंतर पाळोदी येथील घनकचरा प्रकल्पाच्या परिसरातील शेती असलेल्या शेतकरी कांतराव शिंदे, बबन पवार, सदाशिवराव डाखोरे, अंकुश वायकोळे, सुनील वायकोळे, यशवंत वायकोळे बालाजी वायकुळे, परसराम खंदारे या शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना मदत केली तर परिसरातील शेतकऱ्यांकडून पाणी मिळविण्याकरिता नागरिकांनी तातडीने कनिष्ठ अभियंता एस. एस. धकाते यांना वीज पुरवठा सुरु करण्याची मागणी केली वीजपरवठा सुरु झाल्यानंतर या भागात शेती असलेल्या फरमान अहमद या शेतकऱ्याने आपल्या विंधन विहिरीचे पाणी अग्निशमन दलाच्या वाहनांना उपलब्ध करुन दिले.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या वाहनांकडून सात बंब पाणी वापरण्यात येऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु होते. आग आटोक्यात आली असली तरीही कचऱ्याच्या अनेक ढिगार्‍यातून धुराचे लोट सायंकाळपर्यंत सुरु होते. या ठिकाणी कळमनुरी पालिकेचे अग्निशमन दलाचे वाहन आग विझवण्यासाठी घटनास्थळी थांबून आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, पालिकेचे अभियंता नंदकुमार डाखोरे, मोहम्मद जाकिर, गजानन इंगळे, मनोज नकवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com