Crop Insurance : शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानाची भरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी आमदार डॉ. हिकमत उढाण आणि शेतकरी संघटनेने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.
घनसावंगी : खरीप हंगाम २०२४ मध्ये पीक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व स्थानिक आपत्ती या पीक संरक्षणाच्या बाबी अंतर्गत बाधित शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी.