दुष्काळाची व्यथा मांडताना शेतकऱ्यांना कोसळले रडू

कैलास मगर 
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

निल्लोड : निल्लोड (ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) महसूल मंडळात बुधवारी (ता.17) दुष्काळ भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासमोर दुष्काळाची व्यथा मांडतांना शेतकरी व महिलांना रडू कोसळले. त्यांना दिलासा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदतीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे डॉ. सावंत यांनी आश्वासन दिले.

यावेळी आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांची उपस्थिती होती. दुष्काळी भागाची पाहणी करताना मक्याच्या कणसात दाणेच नाहीत तर वाढ न झालेल्या कपाशीला चार-पाच कैऱ्यामुळे एकरी चाळीस-पन्नास किलो कापूस निघाल्यास खर्च कसा भागणार अशी व्यथा मांडणाऱ्या गेवराई शेमी येथील महिलांना पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या समोर अक्षरशः रडू कोसळले. दुष्काळाचे विदारक चित्र पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली व याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळाबाबत गंभीर असून लवकरच मदत घोषित करतील असे आश्वासन दिले. यावेळी गेवराई शेमी, निल्लोड, चिंचखेडा, भवन या गावामधील औरंगाबाद-जळगांव महामार्गलगतच्या शेतात पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांपेक्षा भाजप, काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले.

दौऱ्यात झेंड्याचे राजकारण
दुष्काळ पाहणी दौऱ्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार अब्दुल सत्तार हे त्यांच्या गाडीला पक्षाचा झेंडा लावून फिरत असल्याने हा कार्यक्रम पक्ष्याचा नसून, शासकीय दौरा असल्याचा आक्षेप भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी घेतल्यानंतर झेंडा काढण्यात आला. मात्र नेते दुष्काळाबाबत किती गंभीर आहेत याची नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती. 

Web Title: Farmers Cry when they are talk about drought