nilanga agriculture loss watching
sakal
निलंगा - पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आता नुकसानभरपाईच्या पंचनाम्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना त्यांची दमछाक होत आहे. ई-पीक पाहणी, जिओ टॅगिंग, ७/१२, ८-अ, आधारकार्ड, फार्मर आयडी, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक तसेच सामायिक क्षेत्र असल्यास संहमतीपत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे एका गावचा एकच पंचनामा करून सरकारने सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.