
धाराशिव : शेतकऱ्यांनी ऊस पिकाभोवती लावलेल्या तारांमध्ये सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे विजेचा धक्का लागून पश्चिम बंगालमधील एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वाशी तालुक्यातील पार्डी येथील दोन शेतकरी भावांविरोधात वाशी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.२१) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.