

Infrastructure Crisis in Adul Revenue Circle: Farmers Face Hardships
Sakal
आडूळ : पैठण तालुक्यातील आडूळ महसूल मंडळाला स्वतःच्या मालकीच्या इमारती मंजूर होऊनही आजतागायत बहुतांश कार्यालये भाड्याच्या खोलीतच सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. मंडळातील सहा सजा कार्यालयांसाठी शासनाने मंजुरी दिली असली, तरी प्रत्यक्षात फक्त दोनच इमारतींचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित चार ठिकाणी काम रखडल्याने शेतकरी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.