पीकविमा भरण्यासंदर्भात ऑनलाइन संदर्भातील अडचणी सोडवा : खा. राजेनिंबाळकर

तानाजी जाधवर
गुरुवार, 30 जुलै 2020

जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना ऑनलाईन पिकविमा भरतेवेळी पोर्टलवर आपली नावे, क्षेत्र दिसत नव्हती. यामुळे शेतकरी विमा संरक्षण योजनेचा लाभ घेण्यापासून अलिप्त राहणार होते. या पार्श्वभुमीवर राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची मुंबईत खासदार श्री.राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांनी भेट घेतली होती. तेव्हा त्यानी योजनेतील त्रुटी मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील पिकविमा खरीप हंगाम योजनेसाठी अर्ज भरताना ऑनलाइन पोर्टलवरती ज्या काही शेतकरी बांधवांची नावे, सातबारा,आठ अ उतारे दिसुन येत नव्हती, अशा शेतकऱ्यांना  पिकविमा ऑफलाईन पध्दतीने ३१ जुलैपर्यंत भरण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना ऑनलाईन पिकविमा भरतेवेळी पोर्टलवर आपली नावे, क्षेत्र दिसत नव्हती. यामुळे शेतकरी विमा संरक्षण योजनेचा लाभ घेण्यापासून अलिप्त राहणार होते. या पार्श्वभुमीवर राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची मुंबईत खासदार श्री.राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांनी भेट घेतली होती. तेव्हा त्यानी योजनेतील त्रुटी मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. यामुळे अशा त्रुटी असणाऱ्या शेतकरी बांधवांचे पिकविमा ऑफलाइन पध्दतीने स्विकारण्यास अनुमती द्यावी अशी विनंती करण्यात आली होती.

यावेळी मंत्री श्री. भुसे यानी कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी संपर्क साधून कृषी विभाग व विमा कंपनी यांनी समनव्यातुन तक्रारीचे निवारण करावे अशा सूचना दिल्या होत्या. यानुषंगाने पिकविमा भरण्यापासून अलिप्त राहणाऱ्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामतंर्गत पिक विमा ऑनलाईन भरताना ज्या शेतकऱ्यांचा सातबाराचा डाटा व्हेरिफाय होत नाही, अशा शेतकऱ्यांचा पिक विमाचा डाटा व्हेरिफीकेशनच्या अधिन राहुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत स्विकारणे बाबत सुचित केलेले आहे. तरी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे, विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे सातबाराचा डाटा व्हेरिफाय होत नाही म्हणून पिक विमा भरता आलेला नाही.

अशा  शेतकऱ्यांनी ज़िल्हा मध्यवर्ती बँक़ेमध्ये ऑफ़लाईन पद्धतीने विमा भरता येईल, बँकेमध्ये पिक विमा भरताना अर्जासोबत बँक पासबुक, आधार कार्ड, सातबारा उतारा, पिक पेरा स्वयंघोषणापत्र व प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै ऑफलाईन भरून घेऊन पिकविमा संरक्षण योजनेत सहभागी व्हावे असे अवाहन खासदार राजेनिंबाळकर व आमदार घाडगे पाटील यानी केले आहे.

संपादन- सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers have till July to pay off crop insurance offline